Mumbai Maharashtra

बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा…!

जॉन मेढे (वरिष्ठ पत्रकार )

बांगलादेशी नागरिकांची वाढती घुसखोरी महाराष्ट्रा पुढे एक मोठी जटिल समस्या असून या.घुसखोरीचा बीमोड करण्याची वेळ आली आहे.भाजपचे नेते डॉ किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी उघडकीस आणली. आपल्या सर्वच प्रकारच्या शासकीय यंत्रणेला देश आणि मराठी मुलखाप्रती किती प्रेम,आदर आणि स्वाभिमान आहे .याचे प्रत्यंतर येते. भ्रष्टाचाराच्य गटार गंगेत आकंठ बुडालेले शासकीय अधिकारी कोणत्या थराला जातील आणि काय करतील याचा नेम राहिलेला नाही .महाराष्ट्रातील आमरावती जिल्हा हे भ्रष्टाचाराच्या नमुन्याचे उत्तम उत्तम उदाहरण आहे. पैसा,छान छोकी आणि भौतिक सुख यासाठी आपले बाबुलोक किती आसुसलेल्या. या जमातीला स्वार्था पलिकडे काही ही दिसत नाही.हे या मराठी माय भूमीचे दुर्दैवच म्हणावं लागेल. निर्ल्लजपणाचे पाईक असलेली यंत्रणा आणि तिच्या आश्रयदात्याना धडा देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील ही वाढती घुसखोरी डोकेदुखी ठरत असून तिचे नासुर होण्यापूर्वीच उखडून फेकायला हवी. घुसखोरांनी ठीक ठिकाणी केलेली अतिक्रमणे उभारलेल्या वस्त्यांनी ‘ मिनी पाकिस्तान आणि मिनी बांगलादेश यांचे स्वरूप आले आहे . निर्ढावलेले हे नागरिक कुणाच्याही बापाला भिक घालत नाहीत अशा आविर्भावात त्या त्या मोहल्ल्यात ठाण मांडून बसले आहेत.

आज मितीस त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारने क्रमप्राप्त ठरेल . पूर्वोत्तर राज्यासह पश्चिम बंगाल,आसाम ,मिझोराम ओरिसा ह्या राज्याच्या लगत सुमारे साडेचार हजार किलोमीटर लांबीची भारताची सीमा आहे .मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा सीमावर्ती प्रदेश सध्या अत्यंत असुरक्षित आहे. सीमा सुरक्षा बाबत कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही.अथवा तसा प्रयत्न ही झालेला दिसत नाही .गेल्या पन्नासेक वर्षापासून बांगला देशी नागरिकांची घुसखोरी अव्याहतपणे सुरू आहे. .साडेचार हजार किलोमीटर अंतर असलेल्या सीमेला संरक्षक कुंपणच नाही .शिवाय सीमावर्ती भागातील भौगोलिक परिस्थिती , बांगला देशातील गरिबी .अशिक्षित समाज आणि दररोजच्या जीवन मरणाची लढाई .. ही घुसखोरीची मूलभूत करणे असू शकतात. बांगलादेशातून भारतात होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी बी एस एफ आणि बी बी जी .यांच्यात पुढील महिन्यात 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एक बैठक होत आहे. त्यादृष्टीने घेतलेला हा मागोवा

आसाम मिझोराम ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या सीमा भागातून रात्री अंधाराचा फायदा घेत दलाला मंडळी घुसखोरांना भारतात धाडतात ..विशेष म्हणजे पश्चिम बंगाल सीमावर्ती प्रदेश घुसखोरांना.अत्यंत सुलभ आणि सोपा पर्याय असल्याचे दिसते . इंग्रजी सत्तेचा आंमल असताना सन 1905 ला लॉर्ड कॉर्न वॉलिस या व्हॉईस रोयने तत्कालीन पश्चिम बंगाल ची फाळणी करून पूर्व आणि पश्चिम बंगाल ची निर्मिती केली . पूर्व बंगाल म्हणजे आजचा बंगला देश. स्वातंत्र्या नंतर अर्थत गेल्या पन्नास वर्षां पासून अगदी बिनदिक्कतपणे ही घुसखोरी केली जात आहे. हिंदुस्तानच्या आश्रयाला आलेली बांगला देशी घुसखोरांची आश्रय स्थान .तर घुसखोरीला खतपाणी घालणारे दलाल लाख दोन लाख बांगला टक्का घेऊन त्यांना पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात आणून सोडतात. आणि मग तिथून पुढे ते मुंबई कडे सरकतात .जागतिक स्थरावर पाकिस्तानला धडा देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा तुकडा पाडून १९७२ गेल्या काही वर्षांत लाखो घुसखोर बांगला देशी नागरिक पश्चिम बंगाल मध्ये वास्तव्यास आहेत . पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झालेल्या घुसखोरांनी आपल्या वास्तव्याचे सर्व पुरावे तयार करून याठिकाणी कायम स्वरुपी बस्तान बसविले आहे . ते आज इथले जहागीरदार झालेत .त्यामुळे मूळ भारतीयाला उपाऱ्या ची गत झाली आहे. नव्या घुसखोरांना ते अपनी बिरदरिका हैं ! सांगून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. मग स्थानिक दलाल मंडळीं शासकीय अधिकारी अर्थात ‘बाबू कंपनी ‘ स हाताशी धरून आधार कार्ड . पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र , रेशन कार्ड.आदी शासकीय पुराव्यांच्या आधारे हे घुसखोर पोटासाठी भारतभर भटकत असतात ..

बांगलादेशी घुसखोरांना भारतात पाठविणाऱ्या दलालांचे मोठं जाळं बांगला देशात कार्यरत असून लाख दोनलाख बांगला टक्का घेऊन चोर मार्गाने ,कधी भुयारी मार्ग आणि अंधाराचा फायदा घेत मंडळी भारतात येऊन राहतात. आणि मग हळूहळू पुढे सरकत ते महाराष्ट्रात आणि मुंबई सारख्या मायावी स्वप्न नगरीत दाखल होतात . कारण मुंबईत गेलं की तरल .या मुंबईच्या भूमीत त्यांना संरक्षण मिळत . जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात . म्हणून ते मुंबईचा आसरा घेतात. मुंबईत आज मीतीस साडेतीन ते चार लाखच्या आसपास बांगलादेशी घुसखोर पोटासाठी आश्रयास येतात. महाराष्ट्रात त्यांनी आपलं जाळं पसरलं असून गाव खेड्यांपर्यंत हे घुसखोर येऊन धडकलेत . पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधून यालोकानी आपले बस्तान बसवले आहे.मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ भागेना आहेत. विशेषतः कोल्हापूर पुणे. सांगली या ठिकाणी कष्टाची कामे रस्त्यांची कामे आणि बांधकाम व्यवसायात मजूर म्हणून काम करत आहेत . अमरावती , परभणी नाशिक शिर्डी औरंगाबाद, मालेगाव

आदी ठिकाणी कोटी दुकाने हॉटेल्स छोटे उद्योग धंदे अशा ठिकाणी काम करतात .तर मुंबई आणि मुंबई शेजारील ठाणे जिल्हा नवी मुंबई पेन पनवेल अशा शहरांसह कोकणा पर्यंत पर प्रांतीय आणि बांगलादेशी नागरिकांनी मुसंडी मारलीय.पैकी एकट्या मुंबई दोन अडीच लाखा दरम्यान त्यांची संख्या आहे . घाटकोपर गोवंडी मानखुर्द मानखुर्द नालासोपारा वसई विरार मिरा भाईंदर बांद्रा कुर्ला मालाड मालवणी जोगेश्वरी अंधेरी माहीम अणुशक्तीतीनगर ट्रॉम्बे रेरोड शिवडी वडाळा अँटोप हील , संगम नगर , खैरानी रोड .भांडुप तर ठाणे पश्चिम भिवंडी पडघा पालघर यासह अन्य आजूबाजूच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या ह्या काय सांगतात ? त्याशिवाय रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे असलेले मोठमोठे गोडाऊन दुकाने टपऱ्या कुणाच्या आहेत याचा पोलिसांनी त्यांचं रक्षण न करता त्यांचा शोध एकदा तरी घ्यावा .अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे .

) कधी कधी घुसखोरांना नदी पात्रातून पाठवले जाते .त्याला ‘ बोलीभाषेत गर्दनिया व्हिसा म्हणतात .त्यांच्या मानेला धरून नदीपात्रात सोदले जाते ….बॉक्स २) आपलाच माणूस आहे… आपनी बिरादरिका हैं … हीच माणुसकी घुसखोरीला खतपाणी घालते. अनेकवेळा स्थानिक नागरिकांकडून आपला माणूस म्हणून त्यांना आश्रय दिला जातो.स्थानिकांच्या माणुसकीचा गैरफायदा घेत ही हे लोक इथल्या सर्व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कागपत्रे तयार करून आपले बस्तान बसवतात .बनावट ओळख पत्रामुळे हे बंगाली घुसखोर कधी कधी उत्तर भारतीय बिरदरीचे वाटतात .आणि मग आपली फसगत होते.बंगाली घुसखोर हे अवैध धंदे आणि गुन्हेगारी क्षेत्रात अधिक आहेत हुजी सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असतो.त्यामुळे स्थानिकांनी अशा लोकांनाआश्रय अथवा घरे भाड्याने देण्यापूर्वी त्यांची सर्व चौकशी व शहनिशा करून घेणे आज गरजेचे आहे . ३) कफ परेड परिसरात माईन हयात बादशाह शेख नामक एका मौलनास काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली .तो तीस पस्तीस वर्षापासून येथे वास्तव्यास होता . त्याचा मुलगा अमेरिकेत शिक्षत आहे .तो मदरशांमध्ये मुस्लिम मुलांना धर्म शिक्षण देई .त्यातून मिळणारे पैसे तो बांगला देशात असलेल्या आपल्या कुटुंबाला पाठवत असे.पण बँकेतून ते बांगला टक्का अर्थात बांगलादेशी चलनात पाठवताना बँकेला ही सहा संशय न यावा ही मोठी आश्चर्याची बाब आहे. त्याला काही दिवसापूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन आपली शासकीय यंत्रणा किती सजग आहे .हे समोर येते .

बांगलादेशी घुसखोरांचा वाढता वावर आणि वाढती संख्या महाराष्ट्रासह मुंबई ठाणे नवी मुंबई ह्या शहरांना अत्यंत घातक असून भविष्याचा विचार करून या हुसकावून लावण्यासाठी लवकरच एक बांगला देशी नागरिक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे .बांगला देशी घुसखोरांचा मुंबईतून नव्हे तर महाराष्ट्र आणि देशातून उच्चाटन केले जाईल ….मंगल प्रभात लोढा. ..सहाय्यक पालकमंत्री

बांगला देशी नागरिकांची घुसखोरी ही राष्ट्रीय समस्या असून तिचे मुळापासून उच्चाटन करण्याची गरज आहे. घुसखोरी हा सांप्रदायिक प्रश्न नसून तो देशा पुढील एकोठे आव्हान आहे .या लढाईत प्रत्येक भारतीयाने सहभागी झालं पाहिजे ….. ……हिंदू जनजागृती समिती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button