धोकादायक नसेल ही पण भीतीदायक आहे !कोरोनाचे सावट कायम

मुंबई / जॉन मेढे

धोकादायक नसेल ही पण भीतीदायक आहे !साडेतीन चार वर्षापूर्वी कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला होता .त्यात लाखोंचा नरसंहार झाला . कोविडच्या दुःखद आठवणी हृदयात आज ही घर करून बसल्या आहेत … आठवणींच्या जखमांचे व्रण अजून ही ताजे आहेत. कोरोनामुळे माणसं दगावली ,दुरावली . … ह्या जागतिक महामारी आम्ही इतके आगतिक झालो की माणसा माणसात माणुसकीचा लवलेश शिल्लक राहिला नव्हता. मुलापासून आई आणि लेकीपासून बाप दुरावला होता गावाकडची आपली माणसं आपल्याला परक्या सारखी वागणूक देऊ लागली होती . जिवंत असून ही नात्यांमध्ये एक प्रकारची निर्जिवता आली होती. जगाची आर्थिक घडी पार विस्कटून गेली .ह्या भयानक महामारीत अख्ख जग भरडल गेलं आणि होरपळ गेलं होतं.त्याचा दाह आज ही जाणवतो आहे.

या महामारीच्या दहशतीने सर्वंच्याच तोंडचे पाणी पळविले होते . जगाच्या पाठीवर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . हाँगकाँग , सिंगापूर थायलंड इंग्लंड आणि आता.भारतातही कोरोनाच्या विषाणूंने शिरकाव केला. चीनला यापूर्वीच कोरोनाने तडाखा दिकेला आहे.आता त्याने पुन्हा एकदा डोके वर काढले असून हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याची व्याप्ती वाढण्यापूर्वीच आपण काळजी घ्यायला हवी .सरकारी यंत्रणांनी आल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे नागरिकांना सूचना देत घाबरून जाऊ नका .म्हणत धीर देण्याचे काम केले आहे …वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींवर विशवास ठेवून आपण गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. पूर्वी इतके त्याचे स्वरूप भयानक अथवा धोकादायक नसले तरी भीतीदायक मात्र नक्की आहे. जे एन 1,एल एफ 7,एन 1.8 आणि मायक्रो व्हेरीयंट पेक्षा सौम्य आहे .प्रभावी नसल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी केला आहे. त्याच्या तीव्रता आणि सौम्यत्ता याबाबत आद्याप उलगडा झाला नसून मात्र त्यावर संशोधन सुरू आहे . तथापि कोविडच्या दुःखद कालखंडाचा अनुभव ध्यानात घेऊन नागरिकांनी खबरदारी बाळगायला हरकत नाही. विशेष म्हणजे बाजारगप्पा आणि अफवांवर सुजाण लोकांनी विश्वास ठेवू नये.प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून घ्यावी.म्हणजे पुढले प्रसंग टळतील .विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने पाहणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल .कुरघोडीचे राजकारण करण्यात वेळ दवडन्यापेक्षाअशा वेळी म्हणजे आज राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा आणि श्रेयवादाला तिलांजली देऊन माणुसकीच्या भावनेतून आणि सामाजिक जाणिवेतून त्याकडे पाहायला हवे.

एक आव्हानात्मक राष्ट्रीय कर्तव्य मानून त्याकडे पाहायला हवे .हा विषाणू सिंगापूर हाँगकाँग मध्ये झपाट्याने वाढत असून आठवड्यात28 %नी वाढला आहे.तर तीस टक्के नव्या रुग्णांची नोंद आहे. रुग्ण दगावन्याचे प्रमाण ब्रिटन मध्ये अधिक आहे .तर भारतात आतापर्यंत 257 हून अधिक जणांना ह्या नव्या व्हेरियन्ट ची लागण झाली आहे.पैकी 168 नवीन रुग्ण आहेत .ही बाब आपल्या साठी अत्यंत गंभीर व धोकादायक असल्याचे मानले जाते .भारतात सर्वाधिक रुग्ण हे केरळातील आहेत .भारतात कोरोनाची सुरुवातच मुळी केरळ मधून झाली होती.आता ही सर्वाधिक रुग्ण हे केरळात असल्याचे आढळून आले आहेत.केरळात 94 लोकांना या विषाणूची लागण झाली असून 66 रुग्ण नवीन आहेत .त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य आहे. तामिळनाडूत 69 जण बाधित आहेत . बेंगळुरू व बेळगावमध्ये ही करोना दाखल झाला असून पंजाब आणि दिल्लीतही करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. याबाबत आजच्या घडीला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.पुणे मुंबई आणि ठाण्यात या.विषाणू ने शिरकाव केला आहे. मुंबईत के ई एम रुग्णालयात 56 रुग्ण असून गेल्या चोवीस तासांत पस्तीस नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे .पैकी दोन रुग्ण दगावले असून ठाण्यात एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील छ्त्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चाळीस बेड सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. डॉ.मुळगावकर याकडे लक्ष ठेवून आहेत.तर कल्याण मध्ये एक महिला रुग्ण दगावल्याच्या वृत्ताला कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ला यांनी दुजोरा दिला आहे . दरम्यानINSACOG यांच्या माहिती नुसार एल. एफ 7 व एन1.8.1 यांचा उप प्रकारातला असल्याने तो सौम्य असून त्याबाबत नागरिकांनी घाउबरण्याचे कारण नाही .मात्र खबरदारी घ्यावी.असे म्हंटले आहे .याला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे .