..आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला…!

(जाॅन मेढे वरिष्ठ पत्रकार)
मुंबई / प्रतिनिधी :- लग्न करून मी सासरी नांदायला आले. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून आता भावी आयुष्याकडे वाटचाल सुरू झाली होती . माझे पती एका खाजगी कंपनीत कामाला होते . त्यांना जेमतेम पगार होता त्यापगारात ते कसं तरी भागवत असतं .पण महिनाअखेरीस तोंड मिळवणी करतांना त्यांची दमछाक होई .त्यांची ती घुसमट मला पाहवत नव्हती .तेंव्हा आपण आपल्या संसाराचा दुसरं चाक आहोत .हे लक्षात घेऊन मी कामासाठी घरा बाहेर पडले .त्यावेळी शिक्षण अपुर असल्यानं काम मिळविण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या . पण त्यावर मी मात केली … .आई वडिलांची घरची परिस्थिती बेताचीच.त्यामुळे मी शिक्षण अधर्वट सोडून मी लग्नाचा विचार केला .आणि येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत बांधली .पण मी हिम्मत हरले नाही . सासरी घरातली सर्व काम आटोपून मी कामाला जाऊ लागले . .पण मनात दडलेली शिकण्याची सुप्त इच्छा मला स्वस्थ बसू देईना..एकदिवस मी माझ्या पतीला त्याबद्दल विचारले .. तेंव्हा त्यांनी हसत मुखाने क्षणाचाही विलंब लावता मला पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली .संसाराचा गाडा ओढता ओढता मी शिक्षणं घेऊ लागले. सासरी आमचं कुटुंब तास मोठं होतं.. गॅस नसायचा त्यावेळी मी चुलीवर स्वयंपाक करत असे .मुंबईत सारख्या आग्रगण्य आणि आधुनिक शहरात मी चुलीवर स्वयंपाक केला भाकरी केल्या अन् कुटुंबाला आधार दिला. जगण्याच्या संस्कारांतून मी घडत गेले त्यामागे प्रेरणा होती ती त्याग मूर्ती रमाबाई आंबेडकर यांची हे शब्द उच्चारताना वर्षां गांगुर्डे यांचा कंठ दाटून आला आणि समोर बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यातील अश्रू अनाहूतपणे गालावरून ओघळले.. निमित्त होते ते त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे ..कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र या संस्थेच्या महिला विकास विभागाने आयोजित केलेया कार्यक्रमप्रसंगी वर्षां ताईंनी आपल मन मोकळं केलं,

हलक्या स्वरात त्यांनी पुढे सांगितले की माझा अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम घेण्यासाठी नंबर लागला . संगमनेर या शहरात मला पुढील शिक्षणासाठी जावं लागलं. आम्हा नाशिकरांचं आणि संगमनेरच असं एक जवळच नातं आहे . सिन्नरच्या अगदी लगत हे संगमनर हे ऐतिहासिक परंपरा लाभलेलं शहर आहे. अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील वाटचालीस सुरुवात झाली. संसाराचा गाडा सुरू होता ..पण आता मला आशा होती ती शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याची .त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले
.आणि ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड मधील एका खाजगी शाळेत मला शिक्षकाची नोकरी मिळाली . मागचा पुढचा विचार न करता मी ती विक्रमगडच्या शाळेत जॉईन होण्याचा निर्णय घेतला त्याला माझ्या पतींनी होकार दिला .आणि खऱ्या अर्थाने आता संघर्षाला सुरुवात झाली होती.मुंबईपासून दूर रोजचा सहा तासांचा प्रवास मी करत होते. असे जायला तीन तास आणि यायला तीन तास लागत . या सर्व गडबडीत माझं घराकड थोडं दुर्लक्ष झालं . मुलांना आणि कुटुंबाला अधिक वेळ देता येत नसे .याची आजही मला खंत आहे .मुलांचा बालपण , हसणं खेळणं, बागडण हिरमुसून गेलं. त्यांचं बालपण माझ्यामुळे हिरावल गेलं याच फार मोठं दुःख माझ्या मनावर कोरल गेलंय.पदराने पापण्यांच्या कडा पुसत वर्षाताई बोलत्या झाल्या त्यापुढे म्हणाल्या .जीवनात कितीही कठीण प्रसंग आला , संकटं आली तरी माणसानं कधीही हाय खाऊ नये . डगमगून न जाता संकटावर मात करायला शिकलं पाहिजे ..आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि प्रसंगाला तोंड देणं गरजेचं आहे .याची प्रेरणा मिळते ती रमाबाई सारख्या त्यागमुर्ती पासून आणि माझ्या या लढाईची …संघर्षाची खरी प्रेरणा आणि दिशा दर्शक आहेत ते आपले सर्वांचे मायबाप अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई. !
आज मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. इथ पर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष आणि श्रम घेतले ट्रिपल एम ए झाले. महापालिकेची नोकरी सांभाळून मी समाज कार्यात हिरीरीने सहभागी होते.गरिबी आणि जीवन संघर्ष काय असतो हे मी अगदीच जवळून अनुभवले आहे. रस्त्यावरील निराश्रित निराधार ,.मुलांसाठी मायेची सावली म्हणून वर्षाताई त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. जवळपास शंभर अनाथांच्या वर्षाताई नाथ बनल्यात.

रमाबाई ह्या खरोखर.आमच्या माता आहेत. गरिबीला संघर्षाची झालर लावून त्या त्यागमय जीवन जगल्या . त्यांची जीवनगाथा ही आज आणि उद्याच्या तरुण पिढी करीता एक प्रेरणाच आहे .शक्तिस्थळ आहे. माता रमाबाई या कोकणातल्या धोत्रे कुळातील हे कन्यारत्न पुढे आंबेडकर घराण्याची कीर्ती ठरल्या. आई वडिलांचं छत्र बालपणीच हरपले. आई बापाविना पोरकी झालेल्या रमाईना तिच्या काका आणि मामांनी सांभाळलं. मुंबईला ती आपल्या काकांबरोबर राहू लागली .आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा बाबाहेबांशी विवाह झाला. भायखळयातल्या भाजी मंडईत हा विवाह सोहळा पार पडला असे सांगून प्रा .वंदना महाजन पुढे म्हणाल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंबीय हे कबीर पंथीय होते.या उभयतांच्या घरी अठरा विश्व दारिद्य्र .त्यामुळें बालवयातच त्यांनी परिस्थितीचे चटके सोसले. त्या बाबासाहेबांच्या सावली बनून त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. उच्च शिक्षणासाठी बाबसाहेब ज्यावेळी बाहेरगावी म्हणजे कोलंबियाला गेले त्यावेळी दोन्ही घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली .त्यांनी मोठ्या हिंमतीने ही जबाबदारी सा सांभाळी . गरिबी , अनारोग्य आणि औषधावाचून त्यांची चार आपत्ये गेली .एवढं मोठं दुःख पचवून ही माय धीरोदात्यपणे उभी राहिली. माता रमाबाईना लिहिता – वाचता येत असे .हे बाबसाहेब विलायतेला असताना गंगाधर गेल्याचा पुत्रशोक त्यांनीं पत्रातून व्यक्त करून सांगीतला .यावरून त्यांचा सोशिकपणा दिसून येतो . असे सांगून प्रा वंदना महाजन या म्हणाल्या बहिष्कृत भारत ह्या वर्तमान पत्रात बाबासाहेबांनी रमाबाई यांच्या केलेले लेखन अतिशय सुंदर अप्रतिम आहे असे प्रतिपादन केले.तसेच रमाबाईंनी एकदा पंढरपूरला जाण्याची इच्छा बोलून दाखवली त्यावेळी मी तुझ्यासाठी एक पंढरपूर आणि विठ्ठल निर्माण करील आणि त्यात समतेचा विठ्ठल बसवेन .कारण त्याकाळी प्रचंड प्रमाणात जातीयवाद फोफावला होता . आपल्याकडे दलितांचा इतिहास आणि साहित्य नेहमी दुय्यम मानलं गेलं.त्यांची दखल घेतली गेली नाही .ही खंत असून खरा इतिहास दडवला गेल्याचे वंदना महाजन यांनी म्हंटले आहे.
रमाई बाबासाहेबाना ‘ साहेब ‘ म्हणत तर. बाबासाहेब त्यांना लाडाने रमा म्हणत . जगातल्या अवघ्या स्त्रियांना रमाबाई या प्रेरणा स्रोत आहेत. जगण्याची नवी आशा वन उमेद होत . जीवनातील संकटांना कसं तोंड द्यावं याचा धडाच आम्ही रमाई पासून शिकलो आहोत . रमाबाईंच बालपण अत्यंत हालाकीत गेलं .1898 धोत्रे कुळात हे कन्यारत्न जन्मास आले.आणि पुढे आवघ्या नवव्या वर्षी विवाह बंधनात आडकल्या. आंबेडकर घराण्याच्या स्नुषा झाल्या . आई वडील लहानपणीच वारले होते.त्यामुळे मायेला पोरक्या झालेल्या रमाबाई ह्या सदैव बाबासाहेबांच्या मागे त्यांची सावली म्हणून उभ्या राहिल्या .त्यांच्या संघर्षाला तोड नाही. शब्दांच्या पलिकडला त्यांचा हा संघर्ष आहे. माता रमाबाई ह्या आमच्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत.आदर्श आहेत.म्हणूनच आज आम्ही इथे नतमस्तक होतो.अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अनिता वानखेडे मेश्राम यांनी कृतज्ञातायुक्त शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यातला संघर्ष आणि रमाईचे स्थान याविषयी बोलताना त्यांनी सांगितले.घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती.वडील एस टी महामंडळात ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.त्यामुळे त्यांची बदली होईल तिकडे जावं लागे. यवतमाळ जिल्ह्यात वणी हे आमचं गाव .बालपण खेड्यात गेलं.त्यावेळी आमच्याकडे इंग्रजी कॉन्व्हेन्ट स्कूल नव्हते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे झेड पीच्या शाळेत झालं. पुढे चंद्रपूरला वडिलांची बदली झाली .आणि आम्ही इथेच स्थायिक झालो .शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी इंगजिनीरींगला ऍडमिशन घेतले. इंजिनिअर होण्याची इच्छा होती. म्हणून राजुरा इंजिनियरिंग कॉलेज मधून विद्युत अभियांत्रिकी पदवी घेऊन बाहेर पडले . स्पर्धा परीक्षा किंवा युपएससीच्या बाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ होते . चांगलं काम मिळेपर्यंत मी एका खाजगी कंपनीत नोकरी सांभाळून ट्युशन्स घेऊन वडिलांना हातभार लावत असे. हे सर्व करत असताना मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मध्ये इंजिनिअर म्हणुन कामाला लागले माझी प पहिली पोस्टिंग पुण्यात झाली .
त्या सध्या राज्य मस्त्यविकास महामंळावर
व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कार्यरत आहे. माता रमाबाई यांची जीवन गाथा प्रत्येक स्त्रीला उत्प्रेरक ठरणारी आहे एक सामाजिक बांधिलकी जपत आम्ही मुंबई आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केली आहेत. शिक्षणाची आवड असणाऱ्या परंतु ऐपत नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वाचनालये एक मैलाचा दगड ठरू शकते.या हेतूने आमचा हा छोटासा सामाजिक उपक्रम सुरू आहे .असे अनिता वानखेडे मेश्राम यांनी सांगितले. अनंत मेश्राम आईएएस सुनील वाघ,शाम तुलवे, संजय जाधव उपस्थित होते।

ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात माता रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. त्या चित्रपटामुळे रमाबाई यांच्या खऱ्या आयुष्याची ओळख समजली ……सोनाली कुलकर्णी ..अभिनेत्री